ताज्या बातम्या
राजकीय
सामाजिक
कृषी
क्रीडा
मनोरंजन





विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास हेच आमचे ध्येय : प्र. प्राचार्य डॉ. आय.आर. जरळी



हलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात पालक मेळावा संपन्न


हलकर्णी (प्रतिनिधी) : 'विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या क्षमतांचा विकास करून त्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास हेच उद्दिष्ट ठेवून आमचे कनिष्ठ महाविद्यालय उच्च दर्जाचं गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे काम करत आहे. पालकांनी आपल्या पाल्याच्या समस्या मित्रत्वाच्या नात्याने समजून घेऊन त्यांना फक्त महागड्या वस्तू न देता त्यांना चांगल्या वाईट गोष्टींची  जाणीव करून द्यावी.' असे प्रतिपादन हलकर्णी चंदगड येथील दौलत विश्वस्त संस्थेच्या गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे

प्र. प्राचार्य डॉ. आय.आर. जरळी यांनी केले. गुरुवर्य गुरूनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयात बारावी विद्यार्थ्यांची गुणवत्ता व प्रगती याचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या पालक मेळाव्यात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. प्रारंभी विद्यार्थी-पालक समितीचे प्रमुख प्रा.एस.व्हि. चिंचणगी यांनी प्रास्ताविकातून या मेळाव्याचा हेतू स्पष्ट केला.

यावेळी प्रा. सी.एम. तेली  यांनी या सभेपुढील विषयांचा आढावा घेतला. या शैक्षणिक वर्षातील  नूतन पालक शिक्षक समितीची रचना तयार करून अध्यक्ष म्हणून पालक वसंत पाटील (शिवनगे), तर पालक प्रतिनिधी म्हणून शिवराज साळुंखे, प्रकाश आवडणं तर महिला प्रतिनिधी म्हणून जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या अडचणी, समस्या दूर करण्यासाठी व त्यांच्या पुढील व्यवसायिक शिक्षणाच्या दृष्टीने आम्ही आमच्या महाविद्यालयात अभियांत्रिकी व फार्मसी सारख्या उच्चशिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या एम. एच. टी सीईटी सारख्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीचे ज्यादा क्लासेसचे नियोजन करण्याचे या पालक सभेतून ठरवण्यात आले.यावेळी प्रा. एन . के.जावीर व एन. एम. कुचेकर यांनी  मागदर्शन केले.

या पालक सभेच्या आयोजनासाठी दौलत विश्वस्त संस्थेचे ज्येष्ठ संचालक व मार्गदर्शक गोपाळराव पाटील, अध्यक्ष अशोकराव जाधव, उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव विशाल पाटील व सर्व संचालक मंडळाचे प्रोत्साहन लाभले. यावेळी पालक प्रतिनिधी म्हणून वसंत पाटील, यांनी मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमला कनिष्ठ  महाविद्यालयातील  प्रा.एस.पी. घोरपडे, प्राअंकुश नौकुडकर, प्रा टी. डी. मोमिन, प्रा सुरेश कांबळे, प्रा. अजय पाटील, प्रा. रोहित मोरे,  प्रा. सौ.एस.डी. पाटील, प्रा. जे. एम.उत्तुरे , प्रा. एस.एस. सुभेदार, प्रा. गीतांजली पाटील , प्रा.आर.एच. काझी, प्रा.दिव्या पाटील, प्रा.टी.आर. लाखे, प्रा. प्रियांका हरकारे, गोविंद नाईक, परशू नाईक व ईतर शिक्षक, कर्मचारी तसेच जीवणाप्पा पाटील, धोंडिबा लासे व ईतर बहुसंख्य पालक उपस्थित होते.

या समारंभाचे आभार प्रदर्शन प्रा. एस.पी गावडे तर सूत्रसंचालन प्रा. एन.पी. पाटील यांनी केले.

 

thumb
Chandgad
संपादक : महेश बस्सापूरे